संपूर्ण कुटूंबानेच घेतला जीवन संपवण्याचा निर्णय; वडिल आणि मुलीची विष पिऊन आत्महत्या

भोपाळ – कर्जबाजारी शेतकऱ्यापाठोपाठ त्याच्या कन्येनेही जीवनयात्रा संपवल्याची मन हेलावून टाकणारी घटना गुरूवारी मध्यप्रदेशात घडली. त्या राज्यातील एका गावात राहणारा शेतकरी ईश्‍वरसिंह राजपूत (वय 40) कर्जाच्या बोजामुळे त्रस्त होता. त्यातून त्याने घरातच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.

वडिलांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने राजपूत याची कन्या खुशबू (वय 17) हिनेही विषारी द्रव्य प्यायले. त्यामुळे प्रकृती गंभीर बनल्याने तिला उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिचे प्राण वाचू शकले नाहीत. आर्थिक चणचणीमुळे राजपूत आणि त्याचे कुटूंबीय त्रस्त झाले होते. त्यातून संपूर्ण कुटूंबानेच जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.