सोमेश्‍वर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी शैलेंद्र रासकर

सोमेश्‍वरनगर – सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा उपाध्यक्षपदी संचालक शैलेंद्र पंढरीनाथ रासकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मावळते उपाध्यक्ष लालासाहेब माळशिकारे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्‍त झालेल्या जागेवर माजी उपमुखमंत्री व कारखान्याचे मार्गदर्शक अजित पवार यांच्या सुचनेनुसार शैलेंद्र रासकर यांची निवड करण्यात आली. यावेळी बारामतीचे सहायक निबंधक एस. एस. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, लालासाहेब माळशिकारे यांच्यासह संचालक उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.