मुंबई – शाहरुखने 2 नोव्हेंबरला आपला 57 वा वाढदिवस उत्साहात साजरा केला. यावेळी त्याने आपल्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझरही रिलीज केला.चाहत्यांना तो प्रचंड आवडला देखील मात्र नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा बोलीववूड सिनेमांबाबत नाराजी व्यक्त केली. व्हीएफएक्ससह इतर अनेक गोष्टींसाठी ते चित्रपटाला ट्रोल करत आहेत. यासाठी सोशल मीडियावर पुन्हा एकदा ‘बॉयकॉट पठाण’ ट्रेंड झाल्याचेसमोर आले.
‘पठाण’ चित्रपट पुढच्या वर्षी 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसह दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत. या चित्रपटाबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. यामुळेच लोक त्याच्या चित्रपटाच्या टीझरची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते.’पठाण’ चित्रपटात व्हीएफएक्सचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे यावावरूनच आता नेटकऱ्यांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करायला सुरुवात केली आहे.
एका युजरने लिहिले तोच नेहमीच बॉलिवूड प्लॉट आणि ऍक्शन स्टंटने प्रेक्षकांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न. तुम्हांला आवडला नसेल तर बघू नका असा म्हणत बॉयकॉट पठाण असा हॅशटॅग वापरला आहे. तर दुसऱ्याने थेट बॉलिवूडलाच दोष देत अँटी सोशल ऍक्टिविस्ट म्हणत चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर जरी बॉयकॉटची मागणी होत असली तरी चित्रपटाला हा निगेटिव्ह बॅब्लिसिटीचा देखील फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बॉयकॉटचा ट्रेन्ड चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर देखील दिसणार का ? या ट्रेंडचा चित्रपटाच्या कमाईवर कितपत परिणाम होणार हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच समजणार आहे.