मुंबई – शाहरुख खानचा मुलगा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. आता देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या कारणावरून तो पुन्हा चर्चेत आला आहे. आर्यनने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे तो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.
ड्रग्ज प्रकरणानंतर आर्यन खान बॉलिवूडमधील पार्ट्यांमध्ये दिसून आला होता. यानंतर देखील तो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आता आर्यनने एक पोस्ट केली आहे.ज्यामध्ये रेड चिलीजचा क्लॅप बोर्ड दिसत असून एक स्क्रिप्ट देखील दिसत आहे. लिखाणाचे काम पूर्ण झाले असून आता शुटींगसाठी उत्सुक असल्याचे आर्यनने लिहिले आहे.
आर्यन एका वेब सिरीजवर काम करत होता. या सीरिजच्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी तो सांभाळणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. विशेष म्हणजे या फोटोवर त्याची आई गौरी खानने देखील कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना शाहरुखने मुलाला लेखन आणि दिग्दर्शनात आवड असलयाचे म्हंटले होते. शाहरुखची मुलगी सुहाना जोया अख्तरच्या वेब सिरीजमधून आपल्या अभिनयाला सुरुवात करणार असलयाचे देखील यापूर्वी समोर आले आहे.