वाहतुक नियमांचे पालन करण्याचे शाहरुखचे आवाहन

शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून रुपेरी पडद्यावर दिसलेला नाही. सध्या तो आपल्या कुटुंबीयांसमवेत मस्त वेळ घालवतो आहे. याच दरम्यान त्याने सर्वांना वाहतुक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती करणारे ट्रॅफिक पोलिस इन्स्पेक्‍टर राजेंद्र काणे यांच्या कामाला हातभार म्हणून शाहरुखने हे आवाहन केले आहे. शाहरुखने एक 14 सेकंदांचा व्हिडीओ केला आहे.

त्यात तो लोकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करताना दिसतो आहे. त्याच्या सिनेमांबद्दल बोलायचे तर दलकीर सलमान आणि सोनम कपूरच्या आगामी “द झोया फॅक्‍टर’ या सिनेमामध्ये शाहरुख अतिथी कलाकाराच्या रोलमध्ये दिसतो आहे. मात्र त्याने अद्याप या छोट्याशा रोलबाबत काहीच सांगितलेले नाही. कतरिना कैफ आणि अनुष्का शर्माच्या बरोबर “झिरो’ हा शाहरुखचा अलिकडचा सर्वात शेवटचा सिनेमा होता.

त्यानंतर त्याने पुढच्या प्रोजेक्‍टची घोषणा अद्याप केलेली नाही. त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा होईपर्यंत वाहतुक नियमांचे पालन करण्याऱ्या आवाहनाच्या 14 सेकंदांच्या व्हिडीओवरच शाहरुखच्या फॅनना समाधान मानावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.