“डॉन 3’मधून शाहरुख बाहेर

शाहरुखच्या “डॉन’ आणि त्याच्या सिक्‍वेलला फॅन्सचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता “डॉन’ फ्रॅन्चाईजीमधून शाहरुख खान स्वतः बाहेर पडला असल्याची बातमी मिळते आहे. शाहरुखच्या फॅन्ससाठी ही एक धक्कादायक बातमी आहे. शाहरुखच्या जागेवर नवीन डॉन घेण्याचा विचार निर्माते करायला लागले आहेत. त्यासाठी रणवीर सिंहच्या नावाचा विचार सुरू आहे. शाहरुखने या सिनेमामध्ये काम करायला नकार का दिला हे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. पण स्क्रीप्टबाबतच्या काही मुद्दयांवरून शाहरुखने “डॉन 3′ सोडला असल्याचे समजते आहे.

रणवीर सिंहशी याबाबत जरी बोलणे सुरू असले तरी त्याच्याकडून सकारात्मक प्रतिसद मिळाला की नाही, हे देखील अद्याप समजलेले नाही. यापूर्वी रणवीर सिंहने झोया अख्तरच्या “दिल धडकने दो’ आणि “गली बॉय’ सारखे सिनेमे केले आहेत आणि त्यांना बॉक्‍स ऑफिसवर चांगले यश देखील मिळाले आहे. त्यामुळे “डॉन 3′ रणवीरच बनणार असे पक्के मानले जायला लागले आहे. त्यामुळे एक्‍सेल एन्टरटेनमेंटच्या या फ्रॅन्चायजीसाठी रणवीर सिंहबरोबर लवकरच करार केला जाण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.