मुंबई – शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या पहिल्या गाण्यानंतर जेवढा वाद झाला होता तो वाद ट्रेलर प्रदर्शित होता कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आता प्रेक्षकांना पठाण चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा आहे.रिलीजपूर्वीच पठाण हाऊसफुल झाल्याने एका चाहत्याने थेट शाहरुखला टॅग करत सोशल मीडियावर तिकिटांची मागणी केली. शाहरुखने देखील या चाहत्याला नाराज न करता एक भन्नाट रिप्ले दिलाय.
आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुखने सोशल मीडियावर आस्क मी एसआरके कॅम्पने राबवले. ज्यात शाहरुख खान चाहत्यांच्या प्रश्नांना थेट उत्तर देताना दिसतो.पठाण चित्रपटाचे शोज सध्या हाऊसफुल होत असल्याने एका चाहत्याने थेट शाहरुखला तिकिटांबाबत विचारले. चाहता आपल्या ट्विटमध्ये म्हणतो,”बुक माय शोची साईट क्रॅश झाली आहे. तू मला दोन तिकीट मिळवून दे म्हणजे मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघू शकेन.”
चाहत्यांच्या या मागणीवर शाहरुखने देखील भन्नाट उत्तर दिले आहे. शाहरुख म्हणतो,”तिकिटं तर तुझी तुलाच मिळवावी लागतील. क्रॅश किंवा नो क्रॅश” शाहरुखने दिलेलं हे उत्तर चाहत्यांना चांगलेच आवडले आहे. अनेकांनी या उत्तरावर कमेंट करत वेगवेगळ्या मागण्या करायला सुरुवात केल्याचे दिसून येते.
Nahi tickets toh u will have to buy yourself…crash or no crash…. https://t.co/gUxVW5ZtAD
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 21, 2023
शाहरुख खानसोबत या चित्रपटामध्ये अभिनेता जॉन अब्राहाम आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील दिसणार आहे. प्रमोशनसाठी शाहरुखने आपल्या सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देखील दिली आहेत. पठाण २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. पठाणसोबत बहुचर्चित ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा हिंदी चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे.