मुंबई – पठाण या चित्रपटामुळे सध्या अभिनेता शाहरुख खान चांगलाच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर तर पठाण विरोधात अक्षरशः मोहीमच सुरु झाल्याचे दिसून आले होते. अशात अनेकदा ट्रोलर्स आणि शाहरुखचे फॅन्स यांच्यात सोशल मीडिया वॉर होताना देखील दिसून आले. शाहरुखचे क्रेझी फॅन्स अनेकदा ट्रोलर्सना उत्तर देताना देखील दिसून येतात. अशाच एका फॅनने किंग खानला ट्विट करून आपल्या होणाऱ्या मुलाचे नाव ठेवण्याची मागणी केली. शाहरुखने देखील त्याला रिप्लाय देत भन्नाट उत्तर दिल्याचे पाहायला मिळते.
शाहरुख खानच्या फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. अशात एका फरहान नावाच्या चाहत्याने एक ट्विट केले आहे. ज्यात तो म्हणतो,मला मुलगा किंवा मुलगी होणार आहे त्याचे तुम्हाला ठेवायचे आहे. दोन नावे सुचवा अशा आशयाचे ट्विट करत चाहत्याने शाहरुख खानला टॅग केले. आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली की खरंच शाहरुख याला नाव सुचवणार का ? अशात शाहरुखने देखील या फॅनच्या ट्विटला रिप्लाय दिला.
आपल्या फॅनच्या मागणीला शाहरुखने रिप्लाय देत ट्विट केले. आधी तुला बाळ होऊदे मग त्याच नाव ठेऊ… तुझे आणि तुझ्या पत्नीचे ऍडव्हान्समध्ये अभिनंदन. असा रिप्लाय शाहरुख खानने या चाहत्याला दिल्याचे पाहायला मिळते. शाहरुखचा पठाण हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. ज्यात शाहरुखसह जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.