मुंबई – बॉलिवूड किंग खान अभिनेता शाहरुख खानला द यूनिव्हर्सिटी ऑफ लंडनने डॉक्टरेट पदवी दिली आहे. याबाबतची माहिती शाहरुखने आपल्या ट्विटर खात्यावरून दिली. लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ लॉ द्वारा फिलान्थ्रॉपी यामध्ये शाहरुख खानला डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे.
त्यानंतर शाहरुखने आपल्या आपल्या ट्विटर खात्यावरून डॉक्टरेट पदवीसह एक फोटो ट्विट केला आहे. ज्यामध्ये त्याने ‘यूनिव्हर्सिटी ऑफ लॉ’चे आभार मानले असून इतर विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ही पदवी मीर फाउंडेशनच्या टीमला पुढे निस्वार्थ काम करण्यासाठी प्रोत्साहित करेल असे शाहरुखने म्हटले आहे.
Thank u for the honour @universityoflaw & my best wishes to the graduating students. It will encourage our team at @MeerFoundation to strive ‘selfishly’ to share more. pic.twitter.com/IBI1I6UlFY
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 4, 2019