मुंबई – शाहरुख खान सध्या ‘ब्रह्मास्त्र’मधील त्याच्या कॅमिओमुळे चांगलाच चर्चेत आहे.’ब्रह्मास्त्र’मधील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक होत आहे. परंतु आता शाहरुखची पत्नी गौरी खान देखील चर्चेत आली आहे. गौरी खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती खूपच हॉट अंदाजात एंट्री करताना दिसत आहे.
गौरी खान नेहमीच सिम्पल पण अट्रासिटीव्ह लूकमध्ये अनेक ठिकाणी वावरत असते. परंतु यावेळेसचा तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. काळ्या रंगाच्या स्टेपी ड्रेसमध्ये गौरीचा लूक अतिशय खुलून दिसत आहे. सोबत शाहरुख खान नसून देखील तिचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने जास्त मेकअप देखील केलेला दिसत नाही. म्हणूनच चाहत्यांनी व्हिडिओवर गौरीने लूकबाबत आपल्या मुलीला देखील मागे टाकले असल्याचे म्हंटले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
52 वर्षीय गौरी खानने आजच्या काळात स्वतः आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.म्हणूनच तिला अनेकदा शाहरुखच्या नावाची ओळख वापरण्याची गरज पडत नाही. जबाबदार आई आणि एकनिष्ठ पत्नीसोबतच गौरी एक यशस्वी व्यावसायिक महिला देखील आहे. ती शाहरुखच्या कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली होम प्रोडक्शन चित्रपटांची निर्मिती करते, तसेच ती स्वतःचा इंटेरिअरचा व्यवसायही चालवते. 2018 मध्ये, फॉर्च्यून मॅगझिनने 50 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत तिचा समावेश केला होता.