“पवित्र रिश्ता’ही मालिका 2009 मध्ये सुरू झाली होती आणि त्या मालिकेला खूप चांगला प्रतिसाददेखील मिळाला होता. दरम्यानच्या काळात सुशांत हिंदी मालिका सोडून बॉलीवूडमध्ये गेला. त्यानंतर हा रोल हितेन तेजवानीने साकारला होता. सुशांत बॉलीवूडमध्ये चांगला स्थिरावलाही होता. मात्र, त्याच्या आकस्मित झालेल्या मृत्यूमुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. आता “पवित्र रिश्ता’ ही मालिका पुन्हा सुरू होणार आहे आणि त्यात त्याने साकारलेला मानवचा रोलदेखील असणार आहे. आता मानवच्या रोलमध्ये दुसऱ्या अभिनेत्याला निवडण्यात येणार आहे. हा रोल शाहिर शेख हा अभिनेता साकारणार आहे, असे समजते आहे. मात्र, अद्याप याची अधिकृत घोषणा केली गेलेली नाही. शाहिर शेख सध्या “कुछ रंग प्यार के ऐसे भी’ ही मालिका करतो आहे. “पवित्र रिश्ता’मध्ये सुशांत आणि अंकिता लोखंडेने मानव आणि अर्चना या आघाडीच्या जोडीचे रोल केले होते. त्यातील त्यांची केमिस्ट्री, सगळ्यांनाच आवडली होती. आता शाहिर शेख बरोबर तीच केमिस्ट्री दिसू शकेल का, हे थोड्या दिवसांतच समजू शकेल.