शहिदांना युवकाची अनोखी श्रद्धांजली-शरीरावर गोंदली 71 शहिदांची नावे

जयपूर (राजस्थान) – बिकानेरच्या एका युवकाने शहिदांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. सोमवारी त्याने 71 शहिदांची नावे आपल्या शरीरावर गोंदून घेतली आहेत. या 71 शहिदांमध्ये गुरुवारी पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या सीआरपीएफच्या 40 शहिदांबरोवरच इतर 31 शहिदांच्या नावांचा समावेश आहे.

गोपाल असे या युवकाचे नाव असून तो बिकानेरच्या भगतसिंह ब्रिगेडचा सदस्य आहे. शहिद झालेल्या जवानांचा कधीही विसर पडणार नाही, अशी माझी ही श्रद्धांजली आहे, असे गोपालचे म्हणणे आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील प्रत्येकजण शहिदांना श्रद्धांजली वाहत होता. तेव्हा मी ठरवले की, मी अशी श्रद्धांजली वाहीन की ज्यामुळे त्यांनी नावे सदैव स्मरणात राहतील, विसरली जाणार नाहीत. म्हणून मी त्यांची नावे आपल्या शरीरावर गोंदून घेतली.

गोंदून घेतलेल्या शहिदांच्या नावांमध्ये कोटा येथील हेमराज मीणा, जयपूर शाहपुरा येथील रोहिताश लांबा, धौलपूरचे भागीरथ सिंह, भरतपूरचे जीतराम गुर्जर आणि राजसमंद नारायण गुर्जर यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.