शाहीद कपूर दिसणार बॉक्सरच्या भूमिकेत!!!

सध्या बॉलीवूडमध्ये बियोपिक सिनेमा आणि यश हे जणू सूत्रच बनत चालले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला मोठा हिट  ‘संजू’ चित्रपट त्याचीच प्रचिती देऊन गेला.  त्यात जर बियोपिक सिनेमा हा क्रीडा क्षेत्रावर आधारित असेल तर त्याच्या यशाची खात्री आणखी वाढते. ‘गोल्ड’ चित्रपट हे त्याचे ताजे उदाहरण. यामध्ये आणखी भर पडण्याची मोठी शक्यता आहे कारण अभिनेता शाहीद कपूर देखील क्रीडा क्षेत्राशी संबंधित बियोपिक सिनेमा घेऊन येत आहे.

शाहीद कपूर हा आशियाई सुवर्णपदक विजेते बॉक्सर डिंको सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव सध्या ठरले नसून हा चित्रपट राजा कृष्णा मेमन दिग्दर्शित करणार आहेत. कृष्णा मेनन यांनी या अगोदर ‘एअरलिफ्ट’ आणि ‘शेफ’ या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या चित्रपटच्या वृत्तांना स्वतः शाहीद कपूरने दुजोरा दिला आहे. शाहिदने आपल्या एका मुलाखतीत सांगितले की, सुवर्णपदक जिंकून देखील या खेळाडुबद्दल अनेक लोकांना माहिती नाही, हा चित्रपट करण्यासाठी हेच मुख्य कारण आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)