“जर्सी’साठी शाहिद कपूर सज्ज; ट्विटर वर मानले आभार

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा आगामी “जर्सी’ चित्रपटाचे उत्तराखंडमधील शेड्यूल पूर्ण झाले आहे. अभिनेता शाहिद कपूरने आपल्या ट्विटर अकाउंटवरून उत्तराखंड सरकारचे आभार मानले आहेत.

“जर्सी’ या तेलुगू चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी शाहिद कपूर हा खूप मेहनत घेत आहे. यात तो एका क्रिकेटपटूची भूमिका साकारत आहे. शाहिदने ट्विट करत लिहिले की, “जर्सी’चे आणखी एक शेड्यूल पूर्ण झाले आहे.

मी उत्तराखंड सरकारचे आभार मानू इच्छितो की, त्यांनी आम्हाला राज्यातील अनेक सुंदर ठिकाणी चित्रपटाचे शूटिंग सुरक्षितपणे करून दिले आणि आम्ही ते यशस्वीरीत्या पूर्ण केले.’ मृणाल ठाकूरने राज्य सरकारचे आभार व्यक्‍त करत लिहिले की, राज्यातील अनेक सुंदर ठिकाणी चित्रपटाचे शूटिंग सुरक्षितपणे शूट केले गेले आणि ते यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.’ दरम्यान, “जर्सी’चे दिग्दर्शन गौतम तिन्नानौरी यांनी केले आहे. या चित्रपटाची तेलुगू आवृत्तीही गौतमने दिग्दर्शित केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.