शाहिद कपूरला दिवसभरात 20-20 सिगारेट ओढायला लागल्या

शाहिद कपूरच्या “कबीर सिंह’चे शुटिंग आता पूर्ण झाले आहे. “कबीर सिंह’ हा तेलगूमधील “अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक आहे. शाहिद कपूरला या सिनेमासाठी दररोज 20-20 सिगारेटी ओढायला लागल्या. सिनेमात शाहिद एक व्यसनाधिन मेडिकल स्टुडंट असणार आहे. त्याच्या मेहनतीने तो नंतर सर्जन बनतो, अशी कथा आहे. शाहिदने याबाबतची स्वतःची व्यथा सांगितली. सिगारेट ओढण्याचे आपण कधीच समर्थन करणार नाही. पण केवळ सिनेमातील कथेला अनुसरून सिगारेट ओढायला लागली.

“कबीर सिंह’मध्ये हिरोला जेंव्हा राग येतो किंवा तो अधिक उत्तेजित होतो, तेंव्हा तो सतत सिगारेट ओढत असतो. त्यामुळे सिगारेट ओढण्याची सवय करून घ्यायला लागली, असे शाहिदने सांगितले. दिवसभरात एवढ्या सिगारेट ओढल्याने त्याच्या कपड्यांनाही सिगारेटचा वास यायला लागायचा. घरी गेल्यावर मुलांजवळ जाण्याआगोदर त्याला किमान 2 तास स्वच्छ आंघोळ करायला लागायची, तेंव्हा कोठे हा सिगारेटचा वास जायचा, असे शाहिदने सांगितले. मुंबई, उत्तराखंड आणि दिल्लीमध्ये या सिनेमाचे शुटिंग झाले. शुटिंग संपल्याबद्दल एक पार्टी करण्यात आली. त्या पार्टीचे फोटो “कबीर सिंह’ची हिरोईन कियारा आडवाणीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये सगळेच कलाकार समुद्रकिनाऱ्यावर केक कापताना दिसले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.