मुंबई – करोनामुळे उद्भवलेल्या संकटकाळात जसे विविध उद्योगधंदे बंद पडले आहेत, तसेच मनोरंजन क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. नाट्यगृह, सिनेमागृह बंद आहेत. त्यामुळे आपले चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांना खूप अडचणी येत आहेत. मात्र, ओटीटी अर्थात ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्यामुळे अनेक मोठे चित्रपट या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत.
भारतात 2019 मध्ये ओटीटी वापरणाऱ्यांची संख्या 150 मिलियन म्हणजे 15 कोटी इतकी होती. ती दुप्पट होऊ शकते. यासह तब्बल 17 चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची नेटफ्लिक्सने पुष्टी केली आहे. ज्यात सहा नवीन चित्रपट आणि दोन नवीन सीरीजचा समावेश आहे.
यातच शाहिदला नेटफ्लिक्सने काही नव्या प्रोजेक्ट्ससाठी साइन केलंय. इतकेच नाही तर शाहीदने या प्रोजेक्ट्ससाठी नेटफ्लिक्ससोबत १०० कोटी रूपयांची डील साइन केल्याची चर्चा आहे. शाहीद केवळ नेटफ्लिक्स सिनेमा किंवा सीरिजसोबत आपलं डिजिटल डेब्यू करेल इतकंच नाही तर अनेक प्रोजेक्ट्सवर काम करेल. त्यातील कॉन्सेप्ट ड्रिवेन फिक्शन सीरीज आहे. पण शाहिदने याची अधिकृत घोषणा अजून केलेली नाही.
दरम्यान, “गुंजन सक्सेना: कारगिल गर्ल’, “त्रिभंगा’, “क्लास ऑफ’, “एके वर्सेज एके’ “मिसमॅच्ड’, “ए सूटेबल बॉय’, “मसाबा मसाबा’, “बॉम्बे बेगम्स’ आणि “भाग बिनी भाग’ आदी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी या व्यासपीठावर आले आहे.