पुणे – बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर याने आपल्या आगामी “जर्सी’ चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण केले आहे. याबाबत त्याने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी माहिती दिली आहे. हा चित्रपट तेलुगु भाषेत याच नावाने प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे शूटिंग चंडीगढ, कसौली आणि देहराडून येथे करण्यात आले.
View this post on Instagram
या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर शाहिद कपूरने संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. शाहिदने सर्वांचे आभार मानत आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत शाहिद कपूर हा क्रिकेटच्या मैदानावर पाठमोरा उभा असलेला दिसत आहे.
View this post on Instagram
हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, हा जर्सीचा रॅप आहे… करोनाच्या काळात फक्त 47 दिवसांचे शूटिंग अविश्वसनीय आहे. मला या संपूर्ण टीमवर खूपच गर्व आहे. हा कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. मी आजपर्यत केलेल्या चित्रपटांपैकी हा एक खूपच भावनिक असलेला चित्रपट आहे.
View this post on Instagram
सध्या आपण करोनाशी लढा देत असून ही वेळ निश्चित लवकरच निघून जाईल. दरम्यान, तेलुगु भाषेतील सुपरहिट “जर्सी’चा हिंदी रिमेक गौतम तिन्नानुरी हे दिग्दर्शन करणार आहे. यात शाहिदसह अभिनेत्री मृणाल ठाकूर, पंकज कपूर आणि शरद केळकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
View this post on Instagram