मुंबई – अभिनेता शाहीद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांच्याशी संबंधित चर्चा नेहमीच सोशल मीडियावर युजर्सना हव्या असतात. सोशल माध्यमांमध्ये हा अभिनेता आपल्या व्यक्तिगत जीवनाचे किस्से नेहमीच शेअर करत असतो. यातच अलिकडेच मीराने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर करत लग्नानंतर पहिल्यांदाच शाहिद तिच्यासाठी शेफ झाल्याचं म्हटलं आहे.
View this post on Instagram
सध्या लॉकडाउन असल्यामुळे देशातील इतर नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटीदेखील घरीच बसून आहेत. या काळात तेदेखील त्यांच्या कुटुंबीयांना वेळ देत आहेत. त्यातच शाहिदने पहिल्यांदाच मीरासाठी खास पदार्थ तयार केला. या पदार्थाचा फोटो शेअर करत मीराने पाच वर्षांत पहिल्यांदाच शाहिदने कोणतातरी खास पदार्थ केल्याचं सांगितलं.
दरम्यान, शाहिद लवकरच “जर्सी’चे शुटिंग करू शकणार नाही. शाहिदचे पप्पा पंकज कपूर देखील या सिनेमामध्ये त्याच्या मार्गदर्शकाच्या रोलमध्ये असणार आहेत. याशिवाय ऍक्ट्रेस मृणाल ठाकूरही लीड रोलमध्ये दिसणार आहे.