समीर चौघुलेच्या कौतुकात आदराने झुकले शहेनशाह; पाहा लाखमोलाचा फोटो!

समीर चौघुले आणि बिग बी यांचा हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई – छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि प्रेक्षकांना पॉट धरून हसवायला लावणारा कॉमेडी शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम तुफान लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात हा कार्यक्रम न चुकता पाहिला जातो.

नुकतंच या कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमने ‘कौन बनेगा करोडपती 13’ च्या सेटवर जाऊन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. यावेळी अमिताभ यांनी आपण हा कार्यक्रम आवर्जून पहात असल्याचे सांगितल्याने संपूर्ण कलाकारांच्या अंगावर अक्षरशः मूठभर मांस चढले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

दरम्यान, या यावेळी महानायक विनोदाचा बादशाह समीर चौघुले समोर आदराने झुकले आहे. सध्या त्यांचा या ग्रेटभेटीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, चांगलाच चर्चेत आहे. “कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर गेल्यावर समीर चौघुले अमिताभ बच्चन यांच्याशी बोलायला गेले. तेव्हा समीर बिग बींना म्हणाले की मला तुमच्या पाया पडायचे आहे. ‘तुम्ही नका माझ्या पाया पडू, मी तुमच्या पडतो..’ असे अमिताभ म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.