शहीद-ए-आजम थोर क्रांतिकारक वीर भगत सिंग यांच्या जयंतीनिमित्त

– तुषार धुमाळ

‘जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान,
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान’

आज २८ सप्टेंबर आज भगतसिंग यांची जयंती. एक असा युवा क्रांतिकारी ज्याने इंग्रजी राजवटीला सळो की पळो करुन सोडलं. इतकेच नवे ते एक उत्तम वक्ता, पत्रकार, अनुवादक आणि नाट्यअभिनेते सुद्धा होते. स्वातंत्रपूर्व काळामध्ये ब्रिटिशांच्या जुलमी राजवटी विरोधात बंड करत त्याकाळी निर्माण झालेली एक युवा पिढी.

हिंदुस्तानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय यांच्यावर लाठीचार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी करून त्यांच्या मृत्यूस कारण असल्याला जुलमी ब्रिटिश राजवटीला धडा शिकवण्यासाठी उभा राहिलेला हा क्रांतीवीर. त्याचा बदला म्हणून ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साँडसला लाहोर येथे भरदिवसा गोळ्या घालून ठार मारले.

स्वातंत्रपूर्व काळामध्ये ब्रिटिश संसदेमध्ये बॉम्ब टाकून भहिऱ्या झालेल्या जगभर राज्य गाजवणाऱ्या क्रूर ब्रिटीश राजवटीला कानठळ्या बसवणारे सिंहासनाला हादरवणारे, तुरुंगात राहून भारतीय कैद्यांना मिळणाऱ्या वागणुकीच्या विरोधात केलेल आंदोलन केलेले, भारताचा स्वातंत्र्य लढ्यासाठी स्वतःच्या प्रणाची पर्वा न करता त्यांनी केलेले महानकार्य. देशभक्त ‘वीर भगत सिंग’ यांची आज जयंती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)