Shahajibapu Patil। सांगोला तालुक्यात महायुती प्रचारासाठी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील आणि खासदार रणजित निंबाळकर यांचा दौरा सुरू आहे. या दौऱ्यात शहाजीबापू पाटील यांनी तुफान टोलेबाजी केली. यावेळी बोलताना त्यांनी, “अकलूजला रावण जन्मला आणि आमच्या उरावर बसला, आता परत जन्माला घालू नका “असे म्हणत शहाजीबापू पाटील महाविकास आघाडीच्या धैर्यशील मोहिते पाटलांवर जहरी टीका केली.
आता रावण जन्माला घालू नका Shahajibapu Patil।
धैर्यशील मोहिते पाटलांचा शहाजीबापूंनी रावण असा उल्लेख केला. रावण जन्माला घालू नका आणि आपल्या तालुक्याचे वाटोळे करु नका, असे म्हणत त्यांनी मोहिते पाटलांवर टीका केली आहे. शहाजी बापू पाटील म्हणाले, सगळ्यांनी निवडणुकींना गंभीर घेतले पाहिजे. रामाणे रावणाला लंकेत बाण मारला. रावण लंकेत मेला आणि त्याचा आत्मा भरकटत भरकटत अकलूजला येऊना पडला. रावण अकलुजला जन्माला आले. आमच्या उरावर बसलाय आता आमच्यात कोण राम आहे? आम्ही आपलं पाया पडत बसलो. आता रावण जन्माला घालू नका आणि आपल्या तालुक्याचे वाटोळे करु नका.
रामायण आणि महाभारत संपेल पण मोहिते पाटील आणि माझा इतिहास संपायचा नाही 50 वर्ष झालं निरा उजवा कालव्याच्या चार आणि पाच नंबर फाट्याचे पाणी त्यांनी अडवले असल्याचे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी मोहिते पाटलांवर टीका केली. तर रणजितसिंह निंबाळकरांनी डाव्याचे पाणी उजव्याला सोडण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला होता असेही शहाजीबापू म्हणाले. त्यामुळं निंबाळकरांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं असे शहाजीबापू पाटील म्हणाले.
मोहिते पाटील यांच्यावर टीका Shahajibapu Patil।
सांगोला तालुका हा माढा लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळं रणजितसिंह निंबाळकर हे सांगोला तालुक्यात लोकसभेचा प्रचार करत आहेत. या प्रचारानिमित्त आयोजीत केलेल्या सभेत बोलताना शहाबजीबापू पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. तसेच मोहिते पाटील यांच्यावर टीकाही केली.
माढ्यातून भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा संधी दिल्यानंतर आता मोहिते पाटलांनी वेगळा रस्ता धरण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी शरद पवारांना विरोध करून राष्ट्रवादीकडून माढा काढून घेतलेल्या मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा पवारांना साथ द्यायचं ठरवलं आहे. मोहिते पाटील कुटुंबीयांनी पुन्हा एकदा माढ्याचा बालेकिल्ला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.