देशात लॉकडाऊन असल्याने सर्व चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडले असून शूटिंगही बंद आहे. अशा परिस्थितीत सर्व सेलेब्रीटी कुटुंबीयांसह घरीच आहेत. आता महाराष्ट्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी कर शूटिंग करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर बऱ्याच टीव्ही मालिकांकरिता शूटिंग सुरू झाले आहे. त्याचबरोबर बॉलीवूडचे अनेक सेलेब्स घरातूनच ऍड किंवा शॉर्ट फिल्मचे शूटिंग करत आहेत.
दरम्यान, शाहरुख खानदेखील “मन्नत’च्या बाल्कनीमध्ये शूटिंग करताना दिसून आला आहे. यामुळे त्याला पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास शाहरुख खान अखेरच्या वेळी आनंद एल रायच्या “झिरो’ चित्रपटामध्ये दिसला होता. तेव्हापासून तो मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. मात्र, शाहरुख खानने अनेक वेब सीरिज तयार केल्या आहेत.
अलीकडेच नेटफ्लिक्सवर “बेटल’ रिलीज झाला, जो रेड चिलीज एंटरटेन्मेंटने निर्मित केला होता. याशिवाय अयान मुखर्जीच्या आगामी “ब्रह्मास्त्र’मध्ये शाहरुख खान एक कॅमिओची भूमिका साकारत आहे. यात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. मात्र, शाहरुख खानने अद्याप या भूमिकेबाबत कोणतेही विधान केलेले नाही.