बॉलीवुड स्टार शाहरुख खानचे फॅन त्याच्या पुढच्या चित्रपटाची अगदी आतुरतेने वाट बघत आहेत. शाहरुख खानला सर्वात शेवटी आनंद एल रॉयच्या “झिरो’ मध्ये बघितले गेले होते. पण “झिरो’ आपटल्यावर शाहरुखने थोडावेळ विश्रांती घ्यायचे ठरवले.
आता बातम्या येत आहेत की शाहरुख लवकरच हॉलिवूडच्या एका चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून कमबॅक् करणार आहे. पण या सिनेमात शाहरुख हिरोच्या रोलमध्ये नाही, तर व्हिलनच्या रोलमध्ये दिसणार आहे. निखील द्विवेदीने हॉलिवूडच्या “किल बिल’च्या हिंदी रिमेकचे हक्क विकत घेतले आहेत आणि लवकरच या प्रोजेक्टचे काम सुरू होणार आहे. “किल बिल’च्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन अनुराग कश्यप करणार आहे. त्यातील व्हिलनचा रोल शाहरुखने करावा, अशी प्राथमिक चर्चा सुरू आहे.
यापूर्वीही शाहरुखने “डर’, “अंजाम’ आणि “बाजीगर’मध्ये व्हिलनचा रोल केला होता. त्याचा हा नकारात्मक रोलही प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्याच्या फॅन्सनी त्याला या रोलमध्येही स्वीकारले होते. आता बऱ्याच वर्षांनंतर शाहरुख व्हिलन साकारायला तयार झाला आहे. याही वेळी त्याला प्रेक्षकांकडून तसाच प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे.