शाहरुखला करायचे आहे ऍक्‍शन सिनेमांचे दिग्दर्शन

मुंबई – बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान सध्या खूपच चर्चेत आहे. आपल्याला आता दिग्दर्शनाच्या क्षेत्रात नशिब आजमावायचे आहे, असे शाहरुखने एका इंटरव्ह्यूदरम्यान म्हटले होते. तेंव्हापासून त्याच्या दिग्दर्शनाच्या करिअरला कधी सुरुवात होते आहे, याची त्याचे चाहते वाट बघत आहेत. शाहरुखने जर दिग्दर्शन केलेच तर त्याला ऍक्‍शन सिनेमांचे दिग्दर्शन करायचे आहे. एक ऍक्‍टर म्हणून आपल्या करिअरबद्दल आपण खूष आहोत.

आत केंव्हाही आपल्या करिअरची दिशा बदलल्यास आपण अगदी एकटे आणि दुःखी होऊ असेही शाहरुखने म्हटले आहे. डायरेक्‍टर होणे म्हणजे सिनेमासाठी देव होण्यासारखे असते. कलाकारांना ऍक्‍टिंग कशी करायची, डायलॉग कसे निवडायचे, स्क्रीप्ट कशी निवडायची हे सगळे एकट्याला करायचे असते. अंधाऱ्या खोलीत बसून एकट्यानेच एडिटिंग करायचे असते.

जर सिनेमा हिट झाला तर तुम्ही हिट होणार. त्यामुळे दिग्दर्शक बनणे ही अगदी एकाकी प्रक्रिया आहे, असे शाहरुखने म्हटले आहे. मात्र त्यातल्या त्यात ऍक्‍शन सिनेमांचे दिग्दर्शन करणे ही एक रोमांचक बाब असेल. त्यामुळे त्याला आपले प्राधान्य असेल, असेही शाहरुख्‌ने म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here