मुंबई – अभनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी नेटकरी गौरी खानला आर्यन खानवरून ट्रोल करतात. तर कधी बॉलिवूड पार्टीजमध्ये दिसल्यामुळे गौरी खान चर्चेत येते. आता मात्र पठाण चित्रपटामुळे गौरी खान चर्चेत आली आहे. शाहरुखचा महिन्यभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या पठाण चित्रपटाने अनेक नवीन रेकॉर्ड मोडीत काढले.
सध्या पठाणच्या कमाईची जोरदार चर्चा आहे. पठाणने जगभरातून तब्बल एक हजार कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे. बॉलीवूड सिनेमांना लागलेले फ्लॉपचे ग्रहण पठाणने संपवले. यानंतर चित्रपटाचे सर्वच स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळाले. गौरी खानने देखील पठाणबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत शाहरुखचे कौतुक केले आहे.
गौरी खानने शेअर केलेल्या पोस्टमध्ये पठाणचे पोस्टर पाहायला मिळत आहे. ‘रेकॉर्ड ब्रेक…’ अशा कॅप्शन खाली गौरी खानने ही पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.ज्यामध्ये पठाणने एक हजार कोटींच्या कमाईचा टप्पा पार केल्याचे समजते. गौरीने शाहरुखचे कौतुक करत केलेल्या या पोस्टमुळे फॅन्स देखील खुश झाले आहेत. फॅन्सने या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
रेकॉर्डब्रेक कमाई
‘पठाण’ चित्रपटाला केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातून प्रचंड प्रेम मिळत आहे.यशराज प्रॉडक्शनने ट्विट करून याबाबतची माहिती दिली. पठाण हा हिंदी चित्रपटातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. भारतातील चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 629 कोटी आहे, त्यापैकी निव्वळ कलेक्शन 520.16 कोटी आहे. परदेशातील चित्रपटांचे कलेक्शन 380 कोटी आहे.एकूण कमाईबाबत बोलायचे झाले तर पठाणने 30 दिवसांत जगभरात 1000 कोटींचा गल्ला पार केला आहे.