मुंबई – शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटानंतर आता चाहत्यांना त्याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. अॅटली यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाबाबत दररोज काही ना काही अपडेट येत आहेत. जवानमधील एक सिन क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये किंग खान अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. पठाणनंतर पुन्हा त्याची अॅक्शन पाहून चाहते खुश झाले आहेत. ही लीक झालेली क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
यामुळे शाहरुखचा जवानमधील लूक देखील कॅचर्चेत आला आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये शाहरुख खान रफ लूकमध्ये दिसत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये शाहरुख सिगारेट ओढत असून गुंडांना बेल्टने मारहाण करत आहे. त्याच्या एका फॅन क्लबने ट्विटरवर लोकांना चित्रपटातील क्लिप किंवा फोटो लीक न करण्याची विनंती केली आहे. मात्र, ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हटवण्यात आली. यातील काही स्क्रिनशॉट्स देखील व्हायरल झाल्याने शाहरुखचा चित्रपटातील लूक सर्वांसमोर आला आहे.
हा व्हायरल झालेला व्हिडिओ जवानाचाच असल्याचे सांगण्यात येत आहे.चाहते मात्र हा सिन चांगलाच एन्जॉय करताना दिसत आहेत. शाहरुख खान व्यतिरिक्त ‘जवान’मध्ये विजय सेतुपती आणि नयनतारा देखील दिसणार आहेत. या चित्रपटातून हे दोन्ही कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. त्यात साऊथचा सुपरस्टार विजयचा कॅमिओही सामील असल्याचं बोललं जात आहे.
i don’t know it’s real ‘jawan’ leak video or not but it was goosebump. srk’s look and attitude is just next level. waiting for ‘jawan’ blast. #SRK𓃵 #Jawan_leak pic.twitter.com/sbDC51OAdH
— রহমান মতি (@raahmaanmti123) March 10, 2023
जवानमध्ये अल्लू अर्जुनच्या कॅमिओची देखील बरीच चर्चा झाली होती. जवान देखील पठाणप्रमाणे देशभक्तीशी संबंधित आहे का ? असा सवाल सध्या चाहते सोशल मीडियावर विचारताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी जवानच्या टीजरची अधिकृत झलक सर्वांना पाहायला मिळाली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या रिलीजची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.