संजय लिला भन्साळीच्या सिनेमात पुन्हा काम करणार शाहरुख

शाहरुखने 2018 मध्ये “झिरो’ केला होता. त्यानंतर गेल्या अडीच वर्षात त्याचा कोणताही सिनेमा आलेला नाही. त्याच्या “पठाण’चे शूटिंग सुरू झाले आणि लॉकडाऊनमुळे थांबले. आता संजय लिला भन्साळींच्या आगामी सिनेमात शाहरुख काम करणार असल्याचे समजले आहे. हा एक रोमॅंटिक सिनेमा असणार आहे. आणि त्याचे नाव “इजहार’ असे असणार असल्याचे समजले आहे.

या सिनेमाची स्क्रीप्ट भन्साळींनी शाहरुखला वाचायला दिली आणि या स्क्रीप्टचा विषय शाहरुखच्या डोक्‍यात फिट बसला आहे. हा सिनेमा एका सत्यकथेवर आधारलेला आहे, असे समजते आहे. भन्साळींच्या “देवदास’मध्ये शाहरुख होता. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनी भन्साळी आणि शाहरुख एकत्र येणार आहेत.

“देवदास’,”सांवरिया’,”रामलिला’,”बाजीराव मस्तानी’ आणि “पद्मावत’ आठवले तर भन्साळींच्या सिनेमांबाबत होणारे वाद आणि भव्यदिव्य सेट ही खासियत लक्षात ठेवण्यसारखी आहे. आता “इजहार’बाबतही तशीच शक्‍यता असेल.

अजून “इजहार’बाबत काहीही निश्‍चित नाही. अन्य कलाकारही निश्‍चित व्हायचे आहेत. दिग्दर्शन कोण करणार हे देखील ठरायचे आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर या गोष्टीही ठरतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.