शाहरुख खानचे फॅन त्याच्या नवीन सिनेमाची अगदी आतुरतेने वाट बघत आहेत. आता ही प्रतीक्षा लवकरच समाप्त होईल, अशी चिन्हे दिसायला लागली आहेत. सिद्धार्थ आनंद यांच्या आगामी “पठाण’ मधून शाहरुखचे पडद्यावर पुनरागमन होणार आहे, असे ऐकायला मिळते आहे.
शाहरुखचा एक नवीन लूक बुधवारी सोशल मीडियावर रिलीज झाला. हा लुक “पठाण’मधीलच आहे असे बोलले जाते आहे. याबरोबरच शाहरुखने “पठाण’च्या शूटिंगलाही सुरुवात केली असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
या नवीन लूकमध्ये शाहरुखने केस लांब वाढवलेले दिसते आहे. हे लांब केस वाऱ्यावर उडवत शाहरुख एका कारमधून जाताना दिसतो आहे. “पठाण’ची निर्मिती यशराज फिल्म्सच्या बॅनरखली केली जाते आहे. या सिनेमामध्ये जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोणही असणार असल्याची चर्चा आहे.
या सिनेमाची अधिकृत घोषणा अद्याप केली गेलेली नाही. हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होईल, असा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात आला आहे. मात्र, थिएटरची उपलब्धता आणि पोस्ट प्रॉडक्शनच्या कामामुळे याला किती उशीर लागेल, हे सांगता येऊ शकणार नाही.