बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान हा अखेरच्या वेळी 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या “झिरो’ चित्रपटात झळकला होता. यानंतर त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. याबाबत करण जोहर म्हणाला की, शाहरुख स्वतःला थोडा वेळ देवू इच्छित आहे. परंतु, आता शाहरुख लवकरच पुन्हा एकदा जोरदार डेब्यू करण्यास सज्ज झाला आहे.
यश राज फिल्म्स आपल्या 50 व्या ऍनिव्हर्सरीनिमित्त “पठाण’ चित्रपटाची घोषणा करू शकते. यात शाहरुख खान मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे समजते. हा चित्रपट शाहरुखने साईन केला असून पुढील महिन्यात याची अधिकृत घोषण करण्यात येईल. “पठाण’ चित्रपटाची घोषणा खुद्द आदित्य चोप्रा करणार आहे.
तसेच चित्रपटाच्या शूटिंग डेट आणि प्लेस निश्चित करण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी ही खूपच आनंदाची बातमी आहे. कारण शाहरुख दोन वर्षांनंतर चित्रपटाची घोषणा करणार आहे.
दरम्यान, शाहरुख खानचा मागील “झिरो’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. यामुळेच शाहरुख खानने सेल्फ असेसमेंटसाठी थोडा वेळ घेतला असावा. या दीर्घ काळानंतर शाहरुख पुन्हा जोरदार पुनरागमन करणार असल्याचे दिसते.