मुंबई – बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत आहे. एनसीबीकडून त्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा शाहरुखला मोठा फटका बसल्याचे रिपोर्ट समोर येत आहेत.
एका मोठ्या ब्रॅन्डने शाहरूखसोबतचा कॉन्ट्रॅक्ट तोडला असून काही दिवसांपासून त्याच्या जाहिरीतीचे ऍडव्हान्स पेमेंट देऊनही जाहिरती बंद करण्याची घोषणा केली आहे. हा प्रोजेक्ट शाहरुखच्या मोठ्या प्रोजेक्टपैकी आहे.
एका प्रख्यात इंग्रजी माध्यमाच्या रिपोर्टनुसार, यावर काही जाणकारांनी सांगितले आहे की, एडटेक स्टार्टअप बायजूने या प्रकरणानंतर शाहरुखच्या जाहिराती परत घेतल्या. याबाबत बायजूच्या प्रवक्त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
जाणकारांच्या म्हणण्यानुसार, बायजूसोबत शाहरूखची तीन ते चार कोटी रुपयांची वार्षिक डील ठरलेली होती. तो या कंपनीचा ब्रॅन्ड ऍम्बेसेडर आहे. शाहरुखमुळे या कंपनीची जास्त प्रसिद्धी झाली. मात्र सध्या शाहरुखशी संबंधित सगळं प्रमोशन थांबवलं आहे. कारण शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीला ड्रग्स प्रकरण सुरू असताना त्याच्यासोबत प्रमोशन करायचे नाही. पण शाहरुखला ब्रॅन्ड ऍम्बेसेडर म्हणून काढून टाकण्यात आले की नाही हे अजून स्पष्ट नाही.
दरम्यान, शाहरुख खान बायजूसह हुंदाई, एलजी दुबई टुरिझन, आयसीआयसीआय बॅंक, रिलायन्स जियो यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा ब्रॅन्ड ऍम्बेसेडर आहे. आर्यन खानच्या प्रकरणाचा शाहरूखला सर्वच बाजूंनी मोठा झटका बसला आहे.
शाहरुखच्या ब्रँड मूल्यावर असा होणार परिणाम
विशेष म्हणजे शाहरुख खानच्या एलजी कंपनीच्या जाहिराती अजूनही टीव्हीवर चालू आहेत. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, या गोष्टी अनेक महिन्यांसाठी आखलेल्या आहेत आणि अचानक बदलल्या जाऊ शकत नाहीत. अशा स्थितीत शाहरुख खानचे ब्रँड म्हणून काय होणार हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
काही तज्ज्ञांचे असे म्हणे आहे की, मनोरंजन करणारा म्हणून त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. पण ब्रँड प्रमोटर म्हणून काही काळ गोष्टी बदलतील. दीपिका पदुकोणचे उदाहरण देत तज्ज्ञ म्हणतात की, ती सुद्धा ड्रगच्या प्रकरणात अडकली होती, पण काही काळानंतर ब्रँड्सचा चेहरा म्हणून परत आली.
एक सेलिब्रिटी म्हणून, तुम्ही नेहमी स्वतःला जोखमीच्या मार्गावर ठेवता. पण, आपण अनेक सेलेब्स अडचणीत येताना आणि नंतर त्यातून बाहेर पडताना पाहिले आहे. सेलिब्रिटींना नेहमीच अशा गोष्टींना बळी पडण्याचा पडण्याचा धोका असतो. जरी एखादा ब्रँड त्यांना पाठिंबा देत असला, तरी सोशल मीडिया मध्येच येतो. अशा परिस्थितीत, ब्रँडकडे दुसरा कोणताही मार्ग नसतो.