Shah Rukh Khan and Karthik Aryan | अभिनेता शाहरुख खान आणि कार्तिक आर्यन हे दोघेही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. नुकतेच या दोघांनी इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी (IIFA) अवॉर्ड्स 2025च्या पत्रकार परिषदेला हजेरी लावली होती. यादरम्यान शाहरुख खानने कार्तिक आर्यनला राजस्थानी भाषेचे धडे दिले.
सध्या कार्तिक आणि शाहरुखचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात शाहरुख गमतीत म्हणतो की, कार्तिक यावेळी आयफाच्या २५ व्या वर्षाचे आयोजन केले जात आहे, ज्यासाठी मी तुला होस्टिंग कशी करायची हे शिकवतो. जयपूरमध्ये हा कार्यक्रम कसा सुरू करायचा याची विशेष जबाबदारी मी तुला देतो, असे शाहरुखने सांगितले. Shah Rukh Khan and Karthik Aryan |
View this post on Instagram
‘सगळ्यात आधी तुला ‘पधारो म्हारे आयफा’ म्हणावे लागेल. किंग खानने ही ओळ म्हटल्यानंतर कार्तिकने तीच ओळ पुन्हा म्हटली. असे म्हणत शाहरुख मजेदारपणे कार्तिकला राजस्थानी भाषेचे धडे देतो. यानंतर, दोन्ही कलाकारांनी हात जोडून सर्वांना ‘खम्मा गनी’ म्हटले आणि नम्रपणे हात जोडले. सध्या त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. Shah Rukh Khan and Karthik Aryan |
हेही वाचा: