बॉलीवूड किंग शाहरुख खान अनेक दिवसांपासून त्याच्या सर्व प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. बॉलीवूडचा किंग खान 2023 मध्ये त्याच्या तीन चित्रपटांसह धमाका करणार आहे. नुकताच त्याच्या बहुप्रतिक्षित ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
The wait is Over . #PathaanTeaser is here | 🔥
Celebrate #Pathaan with #YRF50 only at a big screen near you on 25th January, 2023. Releasing in Hindi, Tamil and Telugu. @deepikapadukone| #SiddharthAnand | @yrf | @iamsrk |#3MonthsToPathaan pic.twitter.com/ovPNk5BwFH
— Yash Raj Films (@_YashRajFilms) October 25, 2022
त्यामुळे त्याच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. त्याच्या चित्रपटांमधून, चाहत्यांमध्ये सर्वात गाजलेला चित्रपट पठाणचा बनला आहे. हा टीझर शाहरुखच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच २ नोव्हेंबरला लाँच होणार होता. पण, दिवाळीत हा धमाका करून शाहरुखने चाहत्यांना गिफ्ट दिल्याचं दिसतंय.
शाहरुख खानच्या आगामी तीनही चित्रपटांबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझर व्हिडीओनंतर त्यांच्या उत्साहाचा अंदाज सोशल मीडियावरून लावता येतो. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख जवळपास ३ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. हे पुनरागमन जबरदस्त असणार असल्याचे मानले जात आहे.
2 नोव्हेंबरच्या वाढदिवसाच्या ट्रीटऐवजी शाहरुखने चाहत्यांना दिवाळीची ट्रीट दिली आहे. पठाणचा टीझर यशराज फिल्म्सने रिलीज केला आहे. ट्विटरद्वारे पोस्ट शेअर करत त्याने लिहिले, “प्रतीक्षा संपली… पठाणचा टीझर रिलीज झाला”. हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे जो हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगुमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाणमध्ये शाहरुखशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याआधी शाहरुख आणि दीपिकाची जोडी ओम शांती ओम आणि चेन्नई एक्स्प्रेस सारख्या चित्रपटात दिसली होती, ज्यांना चाहत्यांनी खूप पसंती दिली होती. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला पठाण हा शाहरुख खानच्या तीन चित्रपटांपैकी एक आहे, बाकीचे दोन जवान आणि डंकी आहेत. भारत, स्पेन आणि अनेक ठिकाणी याचे शूटिंग झाले आहे.