मुंबई – बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने पुन्हा एकदा सिद्ध केले की त्याला किंग का म्हणतात. एक दर्जेदार कलाकार असण्यासोबत एक उत्तम माणूस असलयाचे देखील यावेळी शाहरुखने सिद्ध केले आहे. शाहरुख अनेकदा आपल्या फॅन्सची इच्छा पूर्ण करताना दिसत असतो. आता देखील शाहरुखने कॅन्सरग्रस्त महिलेची इच्छा पूर्ण करून मनाचा मोठेपणा दाखवला आहे.
नुकतीच एका 60 वर्षीय कॅन्सरग्रस्त महिलेने मृत्यूपूर्वी शाहरुखला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर शाहरुख खानने स्वतः व्हिडीओ कॉल करत या महिलेची शेवटची इच्छा पूर्ण केली असल्याचे समजते. एवढेच नाही तर शाहरुखने महिलेला आर्थिक मदत करण्याचे आणि मुलीच्या लग्नालाही उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजते.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये शाहरुख एक वृद्ध महिला शिवानी आणि तिच्या मुलीसोबत संभाषण करताना दिसत आहे. यासंबंधीची एक पोस्ट शाहरुख खानच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आली आहे. पोस्टनुसार, शाहरुखने महिलेशी सुमारे 40 मिनिटे गप्पा मारल्या आणि ती लवकर बरी व्हावी अशी इच्छा देखील व्यक्त केली.
Remember Shivani that 60yrs Old Last Stage Cancer Patient from Kolkata Her Last Wish Was to Meet @iamsrk Sir?
Her Wish Got Fulfilled Last Night, Today SRK Sir Called her Talked almost 30 Minutes, He is The Humblest Star on Earth for a Reason,
1/4 pic.twitter.com/gWSSgQpzv4— SRKian Faizy ( FAN ) (@SrkianFaizy9955) May 23, 2023
उत्तर 24 परगणा येथील रहिवासी शिवांगी खर्डा कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजवर आहे. दरम्यान, तिने शाहरुख खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. शाहरुखचा नुकताच आलेला पठाण चित्रपट पाहण्यासाठी ती थिएटरमध्ये देखील गेली होती.यानंतर आता शाहरुखने या महिलेची इच्छा पूर्ण केल्याचे समजते. सोशल मीडियावर ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून नेटकरी याबाबत शाहरुखचे कौतुक करत आहेत.