मुंबई – सोशल मीडियावरती एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला बॉयकॉट करणं हे काही इंडस्ट्रीमध्ये नवीन नाही. परंतु प्रदर्शनापूर्वी अशी घटना घडली तर त्याचा परिणाम चित्रपटावर नक्की होताना दिसून येतो. अलीकडेच आमिर खानचा चित्रपट लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा चित्रपट रक्षाबंधनवर बहिष्कार टाकल्यानंतर आता ट्विटरवर शाहरुख खानच्या पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकल्याची चर्चा आहे. ट्विटरवर बॉयकॉट पठाण हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.
सध्याच्या परिस्थितीत किंग खानचा कमबॅक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चांगलाच अडचणीत सापडला आहे.शाहरुखच्या पठाणवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक युजर्सने यासंबंधात पोस्ट करत शाहरुखचे पोस्टर शेअर केल्याचं दिसून येत आहे. लोक शाहरुख खानच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याबाबत का बोलत आहेत, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण अनेक यूजर्स दीपिका पदुकोणच्या जेएनयू भेटीचे कारण यावेळी सोशल मीडियावर पुढे केले आहे.
Next Mission#BoycottPathan#BoycottbollywoodCompletely pic.twitter.com/8pq07SmTPk
— Dilip Singh Chouhan (@The_DilipRajput) August 13, 2022
पठाण कधी प्रदर्शित होणार?
शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट पठाण २५ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाचे लूकही सोशल मीडियावर समोर आले आहेत.शाहरुखचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ट्विटरवर बॉयकॉट पठाणचा ट्रेंड आल्याने निर्मात्यांची चिंता नक्कीच वाढली आहे.
#BoycottPathan
I #BoycottPathan, You? pic.twitter.com/H9YCx5yTqA— Aman Sharma (@AmanSha11552234) August 13, 2022
लाल सिंग चड्ढाच्या बहिष्कारानंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा खूपच कमी कमाई केल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. बॉयकॉटचा परिणाम चित्रपटाच्या व्यवसायावर स्पष्टपणे दिसून येत आहे. आता शाहरुखच्या चित्रपटाचे काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.