Shah Rukh Khan Death Threats । बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमकी आली आहेत. शाहरुख खानला धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कॉल ट्रेस केला तेव्हा तो रायपूरचा असल्याची माहिती समोर आली आहे, त्यानंतर पोलिसांचे पथक रायपूरला गेले. पुढील तपास अद्याप सुरू आहे.
Shah Rukh Khan Death Threats । काय म्हटले होते धमकीमध्ये?
मुंबई पोलीस या प्रकरणाची गंभीर दखल घेत आहेत. शाहरुख खानला ही धमकी देण्यामागचा हेतू शोधला जात आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक रायपूरला पोहोचले आहे. तेथे हे पथक या प्रकरणाची चौकशी करेल. वांद्रे पोलीस ठाण्यात शाहरुख खानला धमकीचा फोन आला होता.
फोन करणाऱ्या व्यक्तीने म्हटले की, शाहरुख खानला जीव वाचवायचा असेल तर आम्हाला करोडो रुपये द्या. अन्यथा त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल. त्यानंतर कॉल डिस्कनेक्ट झाला. फोन करणाऱ्या आरोपीचे नाव फैजान खान असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने फोन बंद केला आहे. त्याचे ठिकाण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे.
Shah Rukh Khan Death Threats । बुधवारी संध्याकाळी शाहरुख खान दिसला…
शाहरुख खान वांद्रे येथील पर्पल हेझ स्टुडिओमध्ये दिसला. सुपरस्टार येथे डबिंगसाठी आला होता. शाहरुख पांढऱ्या शर्ट आणि काळ्या पँटसोबत काळी टोपी घातलेला दिसत होता. त्याच्या कॅज्युअल लूक चाहत्यांना खूप आवडला. पापाराझी टाळण्यासाठी सुपरस्टार छत्री घेऊन स्टुडिओबाहेर आला. मात्र तरीही फोटोग्राफर्सनी त्याचे फोटो काढले.