मुंबई – शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून शाहरुख खानचे चाहतेही भावूक झाले आहेत. व्हिडिओमध्ये किंग खान त्याच्या एका दिव्यांग महिला चाहत्यासोबत दिसत आहे. व्हिडीओवरून हा एखाद्या रिऍलिटी शो मधील व्हिडीओ असल्याचे समजते. यामध्ये शाहरुख एका व्हील चेअरवर बसलेल्या महिलेला डान्ससाठी प्रोत्साहन देताना दिसतोय.
शो दरम्यान शाहरुखचे ‘चले छय्या छय्या’ हे गाणं सुरु आहे. त्यादरम्यान व्हील चेअरवर बसलेल्या आपल्या चाहत्याला प्रोत्साहन देऊन त्यासोबत डान्स करण्याचा प्रयत्न शाहरुखने केल्याचे पाहायला मिळते. अपंग असलेल्या फॅनसोबत शाहरुखने केलेल्या डान्सचा व्हिडीओ चाहत्यांकडून चांगलाच व्हायरल केला जात आहे.
‘तो केवळ बॉलिवूडचा राजा नाही, तर लाखो हृदयांचा राजाही आहे. तो केवळ एक चांगला स्टार नाही तर एक चांगला पिता, पती आणि एक ग्रेट माणूस देखील आहे. मला शाहरुख खान खूप आवडतो” अशा आशयाखाली आर्टिस्ट असलेल्या निगर परवीनने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या शेवटी, शाहरुख त्याच्या चाहत्याला प्रेमाने मिठी मारतो आणि नंतर त्याच्या पालकांनाही भेटताना दिसतो.
He is not only the King of Bollywood but the King of millions of hearts ❤️
He is not just a Star but great Father, Husband and a Great Human.
I really love @iamsrk !
What’s stopping you from loving him ? pic.twitter.com/xIDMOzbg83— Nigar Parveen (@NigarNawab) August 26, 2022
सध्या शाहरुख खान त्याच्या ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो ‘पठाण’मध्येही दिसणार आहे. ज्यामध्ये दीपिका पदुकोणची जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. जॉन अब्राहम देखील या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असणार आहे.