मुंबई – सेलिब्रेटीसाठी अनेकदा फॅन्स नको ते कारनामे करतात आणि मग असेच व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होतात. बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खानचा असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. कारणही तसच आहे. शाहरुख जेव्हा त्याच्या दोन्हीही मुलांसोबत एअरपोर्टवरून जात होता त्यावेळी हा किस्सा घडल्याचे पाहायला मिळत.
या व्हिडिओमध्ये शाहरुख त्याच्या दोन्हही मुलांसोबत एअरपोर्टवरून जाताना दिसत आहे. आर्यन आणि इब्राहिम यांच्यासह शाहरुख सिक्युरिटीमधून आपल्या गाडीकडे जात होता. अशावेळी एरपोर्टवर शाहरुखचे अनेक फॅन्स उपस्थित होते. त्यातल्या एकाला शाहरुख सोबत सेल्फी घेण्याचा मोफा आवरता आला नाही म्हणून त्याने थेट शाहरुखचा हात पकडत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात चाहत्याने कोणतीही परवानगी न घेतल्याने शाहरुखने त्याचा हात झटकला आणि तो काहीसा दूर झाला.
शाहरुख त्या चाहत्यावर चिडणारच होता तेवढ्यात त्याचा मुलगा आर्यन खानमध्ये आला आणि त्याने त्या फॅनला बाजूला केलं. त्यानंतर शाहरुख आपल्या मुलांसोबत गाडीच्या दिशेने गेला. शाहरुखच्या फॅनचा हा व्हिडीओ सध्या सोहळा मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत वानखेडेची आठवण करून दिली आहे.
View this post on Instagram
शाहरुख खान सध्या ‘डंकी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याने तापसी पन्नूसोबत चित्रपटाचे शेड्यूल पूर्ण केले आणि तो भारतात परतला. चित्रपटाच्या सेटवरून अनेक फोटो आणि व्हिडिओही लीक झाले होते. राजकुमार हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय शाहरुख ‘पठाण’ आणि ‘जवान’मध्येही दिसणार आहे.