हिंदी “द लायन किंग’साठी शाहरुख आणि आर्यनचे डबिंग

डिस्नेच्या गाजलेल्या “द लायन किंग’ला हिंदीमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याची खासियत म्हणजे स्वतः किंग खान शाहरुख आणि त्याचा मुलगा आर्यन या हिंदी “लायन किंग’च्या प्रोसेसमध्ये सहभागी झाले आहेत. हे दोघेही या सिनेमासाठी डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करणार आहेत. शाहरुख खान हा जंगलचा राजा मुफसा आणि आर्यन हा छोटा बछडा सिंबासाठी डबिंग करणार आहे.

आपल्या मुलाबरोबर प्रथमच एखाद्या प्रोजेक्‍टमध्ये काम करायची संधी मिळाल्याने शाहरुखही खूप खूष आहे. “फादर्स डे’च्या दिवशी शाहरुखने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये तो स्वतः आणि आर्यन निळ्या जर्सीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा क्रिकेट सामना बघण्यासाठी बसले आहेत. त्यांच्या जर्सीवर मुस्तफा आणि सिंबा असे लिहीलेले आहे.

त्याच्या या फोटोतूनच त्याने आपल्या या प्रोजेक्‍टची घोषणा केली आहे. “एक नवे सवेरा’ या नावाच्या या हिंदी “द लायन किंग’चे ट्रेलर अलिकडेच सलमान-कतरिनाच्या “भारत’च्या जोडीने रिलीज केले गेले. हा नवीन “द लायन किंग’एकाचवेळी हिंदी, इंग्लिश, तमिळ आणि तेलगू या चारही भाषांमधून 19 जुलैला रिलीज होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.