काश्‍मीरमधील माजी प्रशासकीय अधिकारी शाह फैजल राजकारणात 

श्रीनगर – काश्‍मीरमधील माजी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी शाह फैजल यांनी आपला राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आगामी लोकसभा निवडणूका लढवण्याचाही निर्णय जाहीर केला आहे. “जम्मू अॅण्ड काश्‍मीर पिपल्स मुव्हमेंट’ असे शाह यांच्या नियोजित पक्षाचे नाव असून आज त्याची श्रीनगरमधील राजभाग येथे घोषणा होणार आहे.

2010 मध्ये युपीएससी परिक्षेत देशात अव्वल येणाऱ्या शाह फैजल यांनी या वर्षी जानेवारी महिन्यात शासकीय सेवेला रामराम करत राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. नोकरीचा राजीनामा देताना त्यांनी सरकारच्या जम्मू काश्नीरमधील ध्येय धोरणांवर टीका केली होती. आरबीआय, सीबीआय आणि एनआयए यासारख्या प्रशासकीय संस्थांची स्वायत्तता नष्ट केल्याचा आरोपही त्यांनी केंद्र सरकारवर केला होता. जम्मू-काश्नीरमध्ये मुस्लिमांना गुन्हेगारासारखे वागवले जात आहे. त्यांच्यावर संशय घेतला जात आहे आणि मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले जात असल्याची त्यांची टीका होती. जम्मू काश्‍मीरची सध्याची अवस्था निराशजनक असल्यानेच शाह फैजल यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर शाह फैजल कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार? यावर चर्चा रंगली होती. पण, शाह फैजल यांचा निर्णय झाला असून त्यांनी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.