मुंबई – अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अभिनेता एजाज खान याला “नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने काही दिवसांपूर्वी अटक केली. मुंबई विमानतळावरून एजाज ला ताब्यात घेण्यात आले तो राजस्थानला होता. यापूर्वी “एनसीबी’ने शादाब बटाटा या तस्कराला अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीदरम्यान एजाज खान याचे नाव पुढे आले होते. त्यामुळे “एनसीबी’ने एजाज खानला सुद्धा ताब्यात घेतले आहे.
Actor Ajaz Khan, who was arrested by Narcotics Contro Bureau (NCB) in a drug case, has tested positive for COVID-19. He is being shifted to a hospital. The officer involved in this probe will also undergo COVID test: NCB
(file photo) pic.twitter.com/a5nDB7xpGH
— ANI (@ANI) April 5, 2021
सध्या या सर्वांची एनसीबी कडून चौकशी सुरु आहे. मात्र, चौकशीदरम्यान एजाज खान करोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे. त्यामुळे, तपास अधिकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सध्या एजाजची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना करोना चाचणी करण्यासाठी पाठविण्यात आले असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. राज्यात दिवसेंदिवस करोना बाधितांचीसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
एजाज खान याला “एनसीबी’ने ताब्यात घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गेल्या वर्षी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी त्याला अटक केली गेली होती. त्यापूर्वी 2018 मध्ये अमली पदार्थांच्याच प्रकरणात मुंबईतल्या बदलापूर परिसरातील हॉटेलमधून त्याला ताब्यात घेतले गेले होते. त्यावेळी त्याच्याकडे 2.2 लाख किंमतीच्या एक्स्टसी नावाच्या 8 अमली गोळ्या सापडल्या होत्या.