ह्याला म्हणतात, महाराजांबद्दलचे प्रेम आणि आदर…

मुंबई – ‘स्वराज्य’ निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कर्तृत्त्व सोनेरी अक्षरात कोरलं आहे. या मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच तानाजी मालुसरे. तानाजींच्या पराक्रमाची कथा आता चित्रपटाच्या रुपात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरला सध्या सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली आहे. या ट्रेलरमध्ये ‘स्वराज्यापेक्षा जास्त प्रिय महाराजांसाठी काहिच नसल्याचं दाखवण्यात आलं आहे’.


दरम्यान, या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर कलाकारांनी पत्रकारांशी या संवाद साधला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या पत्रकाराला शरद केळकरने पत्रकार परिषदमध्येच थांबवत तिची चूक लक्षात आणून दिल्याची घटना नुकतीच घडली आहे.

सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओ चांगलेच लाईक मिळत आहे. एका पत्रकारानं प्रश्न विचारताना शिवाजी महाराजांचा केवळ शिवाजी असा एकेरी उल्लेख केला. त्यावेळी शरद केळकरनं प्रश्न मधेच तोडत अतिशय नम्रपणे त्या पत्रकाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा उल्लेख करायला सांगितलं. शरद केळकरच्या या कृतीनं जमलेल्या चाहत्यांची मनं जिंकली आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.


सध्या सोशल माध्यमांमध्ये ‘शाब्बास शरद केळकर, जिंकलस भावा…..’ तसेच ‘हीच तर स्वराज्याची आेळख आहे, सलाम तुमच्या कृतत्वाला आणि महाराष्ट्र-धर्माला शरद केळकर सर … अशा कॅपेंशन देत युजर्स त्यांच्या त्यांना दाद देत आहे. दरम्यान, ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ १० जानेवारी २०२० रोजी चित्रपट गृहात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.