शबाना आझमी शुक्रवारी घरी परतणार

मुंबई : द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या अभिनेत्री शबाना आझमी यांची प्रकृती आता उत्तम असून त्यांना सोमवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आहे. त्यांच्या मोटारीने 18 जानेवारीला ट्रकला मागून ठोकारले होते. त्यात त्यता जखमी झाल्या होत्या.

अख्तर म्हणाले, शबाना या पूर्णत: तंदुरूस्त झाल्या असून त्यांना शुक्रवारी घरी सोडण्यात येणार आहे. त्यांच्या जखमा काही दिवसांपूर्वीच पूर्ण बऱ्या झाल्या होत्या. मात्र डॉक्‍टरांच्या सल्ल्यावरून त्यांना काही दिवस रूग्णालयात ठेवण्यात आले.

अपघात झाल्यानंतर त्यांना सुरवातीला नवी मुंबईतील महात्मा गांधी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमोचार करून त्यांना कोकिळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.