बॉलिवूडमध्ये खेळाडूंच्या आयुष्यावर अनेक चित्रपट बनले आहेत ज्यात मेरी कोम, भाग मिल्खा भाग, एम.एस.धोनी सारख्या चित्रपटांनी तर बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. अशातच काही दिवसांपूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाजी माजी कर्णधार मिताली राजचा बायोपिक येणार असल्याची खूप चर्चा होती. आता या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन मिताली राजच्या बायोपिकमध्ये तापसी पन्नू झळकणार आहे. ‘शाब्बास मिथू’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरमध्ये तापसीच्या हातात बॅट दिसत आहे. तापसीने फर्स्ट पोस्टर तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच मितालीने देखील ट्विटरवर पोस्टर शेअर केले आहे. दिग्दर्शक राहुल ढोलकिया या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.
मिशन मंगल आणि सांड की आंख या हिट झालेल्या सिनेमांनंतर तापसी पन्नूने नुकतेच थप्पड चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. तसेच तापसी एथलिट रश्मिची भूमिका देखील साकारणार आहे.