दापोडीत मतिमंद महिलेवर लैंगिक अत्याचार

पिंपरी  – मतिमंद महिलेचा गैरफायदा घेत तिला घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना दापोडी येथे घडली. शंकर निरभवणे (रा. जयभीमनगर, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ३४ वर्षीय महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी महिलेची पिडित बहिण हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास आरोपीने पीडित महिलेचा गैरफायदा घेत तिला कशाचे तरी आमिष दाखवून घरात नेले. आतून दरवाजा बंद करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.