अश्‍लील व्हिडीओ दाखवून चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी – एका आठ वर्षाच्या चिमुकलीला अश्‍लील व्हिडीओ दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवार (दि.5) ते शनिवार (दि.15) या दरम्यान पवनानगर काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, व्यंकटेश स्वामी (रा. काळेवाडी, पवनानगर येथील मैहबुब शेख यांच्या खोलीत) याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि.5) ते शनिवार (दि.15) दरम्यान आरोपी व्यंकटेश आठ वर्षांच्या चिमुकलीला आपल्या खोलीत बोलवत होता. रुममध्ये नेऊन मोबाईलमधील अश्‍लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर लैंगिंक अत्याचार केले. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.