अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार ; “स्टार बस’चे चार कंडक्‍टर अटकेत

नागपुरमधील धक्‍कादायक प्रकार 

नागपूर: नागपुरमधील एका अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील चारही आरोपी हे नागपूर महापालिकेच्या “आपली बस’ (स्टार बस) सेवेचे कंडक्‍टर आहेत. या चारही आरोपिंना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उमेश ऊर्फ वर्षपाल मेश्राम (22), धर्मपाल मेश्राम (22, दोघे रा. पारडी, पारशिवनी), आशीष लोखंडे (25)अजय (22) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

16 वर्षांची पीडित तरुणी घरापासून महाविद्यालयात जाण्यासाठी महापालिकेच्या “आपली बस’ सेवेचा वापर करायची. बसमध्ये नेहमी प्रवास करत असल्यामुळे तिची 22 वर्षीय धर्मपाल मेश्राम या कंडक्‍टरसोबत ओळख झाली. धर्मपालने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखवले.

नागपुरातील मानकापूर परिसरातील “पूजा रेसिडेन्सी’ या इमारतीत जुलै2018मध्ये धर्मपालने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर धर्मपालने पीडित तरुणीला ब्लॅकमेल करत आपल्या इतर तीन मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. चारी आरोपींनी पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला. तर ऑक्‍टोबर महिन्यात दोन वेळा तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)