‘त्या’ नराधमाला 10 वर्षे सक्‍तमजुरी

स्कूल बस चालकानेच केला होता अत्याचार

पुणे – वारजे येथील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिल्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या शाळेच्या बस चालकाला 10 वर्ष सक्तमजुरी आणि 2 हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायलयाने सुनावली. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संदीप शिवाजी कुंभार (30, रा. कामठे वस्ती, शिवणे) असे शिक्षा झालेल्या चालकाचे नाव आहे. याबाबत 6 वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 10 नोव्हेंबर 2014 ते 13 नोव्हेंबर 2014 दरम्यान आरोपी चालवत असलेल्या शाळेच्या बसमध्ये घडला. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी काम पाहिले. त्यांना अॅॅड. स्मिता देशमुख यांनी सहकार्य केले.

फिर्यादींना यांना दोन मुली आहेत. त्यांची 6 वर्षाची मोठी मुलगी वारजे येथील नामांकीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असताना शाळेच्या बसवर असलेला चालका संदीप कुंभार इतर मुलांना मुलींना बसमधून उतरविल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे पीडित मुलीला त्रास होत असल्याने तिच्या आईने तिला विचारल्यानंतर तिने आरोपीच्या वाईट कृत्याबद्दल सांगितले.

याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन, आरोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्यात सरकारी वकील सुनील मोरे यांनी 8 साक्षीदार तपासताना नराधम आरोपी कुंभारला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने पीडित मुलगी, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची मानताना 10 वर्ष सक्तमजुरी सुनावली. गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मिनल नाईक यांनी केला.

घटनेनंतर बनवली कडक नियमावली

या घटनेत बस चालकाने पीडित मुलीवर केलेल्या अत्याचारानंतर स्कूलबसमधून शाळेत जाणाऱ्या मुला-मुलीच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. अशा अत्याचाराच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. तसेच याप्रकरणी शाळेकडून पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षेवरही प्रश्‍न चिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर प्रशासनाकडून याबाबत कडक नियामावली घालून देण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)