मोशीतील सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश

हॉटेल व्यवस्थापक ताब्यात : चार मुलींची सुटका

पुणे – मोशी परिसरात सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटचा सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी पर्दाफाश केला. या पथकाने मंगळवारी संध्याकाळी एमआयडीसीतील एका हॉटेलवर कारवाई केली. यामध्ये वेश्‍या व्यवसायाचे रॅकेट चालविणारी महिला आणि हॉटेल व्यवस्थापकास ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या तावडीतून 4 मुलींची सुटका करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फुलशी मुशीद शेख खातून (रा. मोशी) या महिलेसह व्यवस्थापक मोहन शिंदे असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोशी परिसरातील एक महिला मुलींकडून वेश्‍याव्यवसाय करून घेत आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकांमार्फत आरोपी खातून हिच्याशी संपर्क साधला. तिने वेश्‍याव्यवसायासाठी मुलगी देण्याचे ठरल्यानंतर त्यांनी एमआयडीसीतील हॉटेलमधील रूम बुक केली. सदर मुलगी रूमवर येताच पथकाने छापा टाकला. यावेळी सदर मुलीसह इतर तीन मुलींची सुटका करण्यात आली. गुन्हे शाखेचे अपर आयुक्त प्रदिप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे, सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)