-->

प्रसिद्ध लैंगिक समुपदेशक डॉ. महिंदर वत्स यांचे निधन

मुंबई – प्रसिद्ध लैंगिक समुपदेशक अर्थात सेक्‍स्पर्ट डॉ. महिंदर वत्स यांचे निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ते 96 वर्षांचे होते. डॉ. महिंदर वत्स यांनी वर्तमानपत्रातील स्तंभ लेखनातून अनेक वाचकांच्या लैंगिक समस्यांचे निराकरण केले होते. भारतासारख्या बलाढ्य देशात लैंगिक शिक्षणाच्या कमतरतेविषयी त्यांनी अनेकदा खंत व्यक्त केली होती.

डॉ. महिंदर वत्स यांनी स्तंभलेखनातून सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील लैंगिक विषयाशी निगडीत लहान मोठ्या शंका-कुशंका दूर केल्या. ज्या विषयावर उघडपणे बोलण्यास फारसं कोणी धजावत नाही, तो विषय डॉ. वत्स यांनी आपल्या सदरातून हलक्‍याफुलक्‍या पद्धतीने मांडला. लैंगिक शिक्षणासोबतच वाचकांच्या तिरकस प्रश्नांनाही डॉक्‍टर विनोदी पद्धतीने उत्तरं देत असत. जडबोजड वाटणारा विषय सोपा करुन सांगण्यात त्यांचा हातखंडा होता.

सल्लागार, मार्गदर्शक, गुरु, समुपदेशक अशा अनेक भूमिका त्यांनी यशस्वीपणे वठवल्या. त्यांनी आयुष्यात अनेक अडथळे पार करत यश मिळवलं. त्यांची नेहमीच आठवण येईल. बाबांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. ते आपल्या पद्धतीने उत्तम जीवन जगले. आज ते आपल्या लाडक्‍या प्रोमिलाच्या भेटीसाठी अनंताच्या प्रवासाला गेले. त्यामुळे आम्हाला त्यांच्या आयुष्याचं सेलिब्रेशन करायला आवडेल, अशा भावना त्यांच्या मुलांनी व्यक्त केल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.