ओरल सेक्स ठरू शकतो जीवघेणा; या आजाराची होते लागण…

मुंबई –  आपल्या जोडीदाराबरोबर आपल नातं घट्ट  होण्यासाठी आदर, काळजी, प्रेम  याबरोबरच निरोगी लैंगिक संबंध हा भाग देखील तितकाच महत्वाचा असतो. जोडीदारबरोबर असुरक्षित सेक्स किंवा अनप्रोटेक्टेड सेक्समुळे अनेक गंभीर किंवा प्राणघातक आजार होण्याची शक्यता असते हे सर्वांना माहीतच आहे. 

बरेच कपल सेक्स करताना याेग्य ती काळजी घेत असतात. परंतु बहुतांश जोडप्यांना ओरल सेक्स केल्यामुळे जीवघेण्या आजारांची लागण होऊ शकते, याची माहिती  त्यांना ठाऊक नसेल. लैंगिक संबंध ठेवतांना काळजी नाही घेतली तर जोडप्यांना काह व्याधी जडू शकतात आणि त्या तुमच्यासाठी गंभीरही ठरू शकतील. म्हणूनच पार्टनरला इंटिमेट टच करतांना काळजी घेणे तितकेच महत्वाचे ठरते. त्याचीच आज आपण माहिती घेणार आहोत. 

ओरल सेक्सदरम्यान ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) पसरू शकतो. यामुळे  घशाचा कॅन्सरसारख्या आजारांना आयते निमंत्रण मिळते. हा आजार लैंगिक संबंधांमधून होतो अशा अनेक केस आता पुढे आल्या आहे.

मात्र, लैंगिकदृष्ट्य्‌ा सक्रिय असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हा आजार होतो, असे नव्हे. या आजारासंबंधी असलेल्या सामाजिक दृष्टिकोनामुळे अनेक जोडपी प्रतिबंधात्मक तपासणी करून घेण्यासाठी पुढे येत आहे. कित्येक लैंगिक आजारांचा प्रार्दुभाव होण्यामागे बहुतांश वेळा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस  कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. या व्हायरसमुळे घशाचा कॅन्सर होण्याची अधिक भीती असते. 

काय आहे ओरल सेक्समुळे होणाऱ्या घशाचा कॅन्सरची लक्षणे
(What are the symptoms of throat cancer caused by oral sex)

-तोंड आणि ओठांचा भाग सून्न पडणे

-अन्नपदार्थ चावताना त्रास होणे

-टॉन्सिल सूजणे

-तोंड आतील बाजूनं सुजणं किंवा फोड येणे

-अन्नपदार्थ गिळताना घशामध्ये तीव्र वेदना होणे

-घसा घवघवणे आणि घसा बसणे, वारंवार खोकला येणे

-तोंड येणे किंवा अल्सरचा त्रास होणे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.